जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आतंरराष्ट्रीय घडामोडीं तसेच ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या सनापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वायदा बाजारासह देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. MCX वर सोने सुमारे 1200 रुपयांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. दर दुसरीकडे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात 2020 रुपयांची वाढ झाली आहे.
अक्षय्यतृतीयेच्या सणानिमित्त सोने खरेदी केली जाते. मात्र सोन्याचे दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसली आहे. फ्युचर्स मार्केट MCX वर, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 12,00 रुपयांच्या वाढीसह 93224 वर व्यवहार करत आहे. 5 जून 2025 रोजी संपणाऱ्या सोन्याच्या करारामध्ये 1.29 टक्क्यांचा बदल दिसून येत आहे. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारात सोने 95,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ते आम्ही तुम्हाला सांगतो.
जळगाव शहरातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 93,220 रुपये आहे. म्हणजेच 1,220 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. राजधानीत सोन्याचा भाव 95,550 रुपयांवर आहे. तर मुंबईत 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 95,400 रुपये आहे. तसेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 95,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.