Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
    क्रीडा

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    १ किमी स्प्रिंटमध्ये १ मिनिट १९.१९ सेकंदांची वेळ नोंदवत पटकावले सुवर्णपदक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2026No Comments31 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ट्रॅक सायकलिंगमध्ये वेग आणि अचूकतेचा ठसा उमटवत जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिने पुणे विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या बळावर तिची अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीमुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही तिला मिळाली आहे. आकांक्षा ही जैन इरिगेशनमधील सहकारी जी.एम. म्हेत्रे यांची मुलगी आहे.

    पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या पुणे विद्यापीठांतर्गत विभागीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षाने महिला गटाच्या एक किलोमीटर स्प्रिंट प्रकारात १ मिनिट १९.१९ सेकंदांची वेळ नोंदवली. प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिने प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तिचा मार्ग मोकळा झाला आहे.

    आकांक्षाची राष्ट्रीय स्तरावरील ही या वर्षातील दुसरी महत्त्वाची संधी होय. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत तिने वरिष्ठ महिला गटात द्वितीय क्रमांक मिळवला होता. या कामगिरीच्या आधारे तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत ती राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आकांक्षाने या पूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल जैन इरिगेशन तसेच जळगावच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय स्पर्धांत आपण चांगली कामगिरी करू असा आत्मविश्वास आकांक्षाला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif