Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»जळगावच्या सराफा बाजारात सोन चार हजारांनी स्वस्त!
    लोकार्थ

    जळगावच्या सराफा बाजारात सोन चार हजारांनी स्वस्त!

    खरेदीदारांना दिलासा : चांदीच्या दरात अठरा हजारांची घसरण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments523 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. आज शुक्रवार दि. 19 जून रोजी देशभरासह जळगावच्या सुप्रसिद्ध सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही मौल्यवान धातूंच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. जळगावच्या स्थानिक बाजारात तर सोन्या-चांदीच्या किमतीत थेट हजारो रुपयांचा फरक पडल्याने ग्राहकांची पावले पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत.

    सुवर्णनगरी जळगावच्या बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. जळगावच्या बाजारात काल सोन्याचे दर 1 लाख 48 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यात आज एकाच दिवसात तब्बल 4 हजार रुपयांची मोठी घसरण होऊन ते 1 लाख 44 हजार 500 रुपयांवर खाली आले आहेत. चांदीच्या किमतीत तर आज मोठा भूकंप झाला आहे. काल 2 लाख 50 हजार रुपये प्रति किलो ग्रॅम असलेला चांदीचा दर आज तब्बल 18 हजार रुपयांनी घसरला असून तो 2 लाख 38 हजार रुपयांवर खाली आला आहे.

    मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर देखील आज सकाळपासूनच कमालीची घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोने तब्बल 1 हजार 593 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे, तर चांदीच्या दरात 6 हजार 57 रुपयांची घसरण नोंदवली गेली. सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये जवळपास 5 टक्क्यांपर्यंत विक्रीचा दबाव दिसून आला. एमसीएक्सवर चांदीचा भाव घसरून सुमारे 2 लाख 37 हजार 620 रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. देशातील विविध शहरांमध्ये चांदीचा दर 2 लाख 38 हजार 700 रुपये ते 2 लाख 59 हजार 900 रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिर आहे.

    सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. सिल्व्हर एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये जवळपास 5 टक्क्यांपर्यंत विक्रीचा दबाव दिसून आला आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव घसरून सुमारे 2 लाख 37 हजार 620 रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. देशातील विविध शहरांमध्ये चांदीचा दर 2 लाख 38 हजार 700 रुपये ते 2 लाख 59 हजार 900 रुपये प्रति किलो दरम्यान आहे.

    भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीने विक्रमी पातळी गाठली होती. आता लग्नाचा हंगाम काहीसा संपल्यामुळे प्रत्यक्ष खरेदीत घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता उच्च पातळीवर नफावसुली करत आहेत. तसेच, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा व्याजदर वाढतात, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक काढून ती सरकारी रोख्यांमध्ये लावतात. यामुळे सोन्याची मागणी घटते आणि किमती कमी होतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif