Sunday, November 27, 2022

महिलेच्या पर्समधून १ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चाळीसगाव यथील बसस्थानकात (Chalisgaon Bus Stand) प्रवाशी माहिला बसमध्ये चढत असतांना तिच्या पर्समधील १ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या (Gold bangles) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- Advertisement -

- Advertisement -

अरुणा शांताराम सुतार (वय ३६, रा. बहादरपूर ता. पारोळा जि.जळगाव) ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता त्या चाळीसगाव येथे कामानिमित्त आलेल्या होत्या. काम आटोपून पुन्हा पारोळा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना चाळीसगाव बसस्थानक येथे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधून १ लाख रूपये किंमतीच्या २५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या.

सदर बाब प्रवाशी महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या