जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण

10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,700 रुपयांनी कमी

0

जळगाव – मागील काही दिवसांत विक्रमी दर गाठल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी सोने व चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच ही घसरण झाल्याने खरेदीसाठी बाजारात चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.
सध्या पावसाळा सुरू असल्याने जरी लग्नसराईचे मुहूर्त नसले तरीही अनेकांनी या शुभमुहूर्ताचा लाभ घेत खरेदी केली.
गुरुवारी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात तब्बल ₹1,700 ची घसरण झाली असून, नव्या दरानुसार सोन्याची किंमत ₹99,100 (जीएसटीसह सुमारे ₹1,02,000) प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट होऊन एक किलो चांदी ₹1,18,500 (जीएसटीसह) दराने उपलब्ध झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.