झळ : सोन्यात २७० रुपयांची वाढ

0

झळ : सोन्यात २७० रुपयांची वाढ

चांदी ४ हजारांनी स्वस्त ;खरेदीदारांचे बजेट कोलमडले

जळगाव प्रतिनिधी सध्या लग्नसराईचा मोसम जोरात सुरू असताना सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. वाढत्या भावामुळे दागिने खरेदी करावी की नाही, असा संभ्रम निर्माण झाला असतानाच आज सोन्याच्या भावात लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल २७० रुपयांची भर पडली असून, १ तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत आता १,२९,९३० रुपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रुपयांची वाढ होऊन ते १,१९,१०० रुपये या पातळीवर पोहोचले आहे. येत्या काळातही सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांचे बजेट मात्र मोठ्या प्रमाणात विस्कटणार आहे.

दरवाढीच्या या लाटेत चांदीने मात्र उलट वाटचाल केली आहे. १ किलो चांदीच्या दरात तब्बल ४,००० रुपयांची घसरण झाली असून, १ किलो चांदी आता १,८७,००० रुपयांना मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया इतिहासात प्रथमच ९० च्या स्तरावर घसरल्याने बाजारात अस्थिरता वाढली आहे. रूपयात सुधारणा न झाल्यास चांदी पुन्हा उच्चांक गाठू शकते, असे चांदी व्यापाऱ्यांचे मत आहे.लग्नसराईच्या काळात आलेल्या या बदलत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसमोर खरेदीची चिंता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.