दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी स्थिर

0

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी स्थिर

जाणून घ्या आजचे दर ….

मुंबई | प्रतिनिधी

सणासुदीच्या काळात आणि दिवाळीच्या आठवड्याच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सोन्याच्या किमतीत किंचित घसरण नोंदवली गेली आहे. देशभरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,३२,७७०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२१,७०० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान, चांदी प्रति किलो ₹१,७०,००० रुपये दराने विकली जात असून, या दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत.

प्रमुख शहरांतील दर

मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ₹१,३२,७७० आणि २२ कॅरेट ₹१,२१,७०० दराने विकले जात आहे.
दिल्ली आणि जयपूर येथे २४ कॅरेट सोने ₹१,३२,९२०, तर २२ कॅरेट सोने ₹१,२१,८५० दराने उपलब्ध आहे.

किंमतींतील चढ-उताराचे प्रमुख कारण

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढीच्या मार्गावर आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपातीच्या संकेतांमुळे आणि गुंतवणूकदारांसाठी सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक पर्याय’ मानले जात असल्याने ही वाढ कायम आहे.

सोन्याच्या किमतीतील चढ-उतारावर डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल यांचा थेट परिणाम होतो. डॉलर मजबूत झाला किंवा रुपया कमकुवत झाला, तर देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढतात.

भारतामध्ये सोने ही केवळ गुंतवणूक नसून परंपरा आणि सांस्कृतिक श्रद्धेशी जोडलेली मालमत्ता मानली जाते. विवाहसोहळे, सण-उत्सव आणि शुभ मुहूर्तात खरेदी वाढते, ज्यामुळे सोन्याच्या मागणीत आणि किंमतीत वाढ दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.