दिवाळीपूर्वी जळगावात चांदीच्या दरात मोठी उसळी, सोने उच्चांकावर स्थिर
जळगाव प्रतिनिधी
दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीच्या बाजारात उलाढाल वाढली आहे. चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांत प्रति किलो १४ हजार रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे, तर सोन्याचे दर उच्चांकावर स्थिर आहेत. सणासुदीच्या काळात खरेदीला वेग आला असून, बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे.
व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
२२ कॅरेट सोने (प्रति तोळा): ₹१,१२,९५०
२४ कॅरेट सोने (प्रति तोळा): ₹१,२३,३००
चांदी (प्रति किलो): ₹१,७०,०००
गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात ₹१,००० ते ₹१,५०० ची वाढ झाली आहे. मात्र, चांदीच्या दरातील ही अभूतपूर्व वाढ बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील चढ-उतार, औद्योगिक मागणी आणि सणासुदीच्या खरेदीमुळे चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दिवाळी, लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामात ग्राहक आकर्षक दागिन्यांसह शुद्धतेची हमी आणि ऑफर्सचा लाभ घेत सोने-चांदी खरेदी करत आहेत. बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून, येत्या काही दिवसांत खरेदी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.