सोन्या -चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचे भाव !

0

लोकशाही न्युज नेटवर्क
जळगावच्या सुवर्णनांगरीमध्ये मंगळवारी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली . सोमवारी सोन्याचे प्रति १० ग्रामला ५७ हजार रुपये दर होते . यात आज मंगळवार ३१ रोजी २०० रुपयांची घसरण होऊन सोन्याला ५६ हजार ८०० रुपये इतका भाव मिळाला .

 

तसेच चांदी सोमवारी प्रतिकिलो ६८ हजार ६९० रुपये इतके असताना आज मंगळवारी यात ५५० रुपयांची घसरण होऊन चांदी ६८ हजार १४० रुपये प्रति किलो दर मंगळवारी जळगावच्या सराफा बाजारपेठेत मिळाला. मागील आठवड्यात सोन्या चांदीच्या दराने उसळी घेतली होती.

 

परंतु आता सुरुवातीच्या आठवड्यात सोन्याचांदीच्या भावात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.