जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा खून

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील गोलाणी मार्केट परिसरात रविवारी रात्री एकाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे. जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या गोलानी मार्केट येथील गायत्री फुल भांडारजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका तरूणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोपान गोविंदा हटकर (३०, रा. हरिविठठल नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

, पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. घटनास्थळी चॉपरचे कव्हर मिळून आले आहे. लागलीच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलीस ठाण्याचे विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.

रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख अद्याप पटली नव्हती. नंतर मात्र, हा मृतदेह सोपानचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरूणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी चॉपरचे खाली कव्हर मिळून आल्यानंतर चॉपरने वार करून खून निर्घृण केल्याचेही स्पष्ट झाले आहे. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.