महाजनांची खालच्या पातळीवर जाऊन आपल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन केले – एकनाथराव खडसे

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याच्या तपासाची आता गरज असल्याचे विधान पत्रकार परिषदेत केले होते, त्याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, की गिरीश महाजन यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्या वेळी मी पंधरा किलोमीटर लांब होतो. घरामध्ये रक्षा खडसे (Raksha Khadse)व मुलगा दोघेच होते, अशा परिस्थितीत संशय घेणे म्हणजे महाजन यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे, हे दिसून येत आहे.

यावरून खडसे कुटुंबाला वेदना झाल्याचे स्वतः खडसे यांनी सांगितले आहे. गिरीश महाजन यांनी केलेले विधानाने माझ्या कुटुंबाला खूप वेदना होत असून मला साठ-सत्तर फोन आले असेही एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष जळगाव पुरता मर्यादित नाही.

मी त्यांच्या मुलाबांळाविषयी बोललो नाही, ते घराणेशाही विषयी बोलले, त्या वेळी मी तुमच्या घरामध्ये साधनाताई या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि नगराध्यक्ष पंधरा वर्षांपासून आहेत. दुसरं कुणी नाही का? तुम्हाला जर मुलगा असता आणि सून असती, तर कदाचित तुम्ही त्यांना राजकारणात आणले असते. मुलाला मी आयुष्यमान भव असे शुभार्शीवाद दिले असते, दुर्दैवाने गिरीशभाऊ यांना मुलगा नाही. असते तर त्यांनी राजकारणात आणले असते, असे मी म्हणालो. गिरीशभाऊ यांनी ‘मी आणखी काही बोलू शकतो’, असे म्हटले आहे, त्यांनी बोलले पाहिजे, लपविता कामा नये.

संपूर्ण महाराष्ट्राला खडसे आणि महाजन यांचा वाद ठाऊक आहे. मात्र, याच काळात खडसे यांनी महाजन यांची गेस्ट हाऊसवरील भानगड मी पाहिली आहे ? असं म्हंटल्याने खळबळ उडाली आहे.

खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूवरुन आम्ही भावूक झाल्याचे देखील खडसे यांनी म्हंटले आहे. महाजन यांनाच मृत्यूचे कारण माहित असावे असं म्हणत खडसे यांनी मला यावर बोलायचे नाही म्हणत पडदा टाकला आहे. पण याच दरम्यान खडसे यांनी महाजन यांच्यावर एक गंभीर टीका केली आहे, त्याच टीकेचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून यायचे. मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश भाऊ यांचे अनेक प्रेम संबंध आहेत. याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असं एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.