Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
    अपघात

    गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

    पिंपरूड फाट्याजवळील घटना ; चार जण जखमी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 18, 2026No Comments493 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे ( वय ४८, रा. रोझोदा, ह.मु. जळगाव) हे भुसावळ येथील लग्नकार्य आटोपून मूळगावी रोझोदा येथे जातांना फैजपूरनजीक १४ रोजी मध्यरात्री १.३० वा. यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी १५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात त्यांच्या परिवारातील पत्नी, मुलगी आणि आई हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे हे परिवारासह १३ मे रोजी भुसावळ येथे चुलत भावाच्या लग्नकार्यानिमीत्त एमएच १९ सीव्ही ०६२४ या वाहनाने गेले होते. गोरज मुहूर्ताचे लग्नकार्य आटोपून ते त्यांच्या मुळगावी रोझोदा येथे जाण्यासाठी निघाले असता पिंपरूड फाट्याजवळ त्यांची कार एका झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात प्रवीण कोल्हे हे गंभीररित्या जखमी झाले. तर परिवारातील त्यांची आई उषा प्रल्हाद कोल्हे (वय ६९), पत्नी हर्षा प्रवीण कोल्हे (वय ३८), मुलगी निर्मीती प्रवीण कोल्हे (वय १०) आणि वहीनी भावना नीलेश कोल्हे (वय ४१) हे जखमी झाले आहेत.

    अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी १५ मे रोजी उपचारादरम्यान प्रवीण कोल्हे यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गोदावरी परिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. प्रवीण कोल्हे यांच्या अपघातील मृत्यूबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलिसात नोंद घेण्यात आली असून फैैजपूर पोलीस ठाण्यात पंचनामा करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif