Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गिरविले एआय तंत्रज्ञानाचे धडे
    जळगाव

    गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गिरविले एआय तंत्रज्ञानाचे धडे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गिरविले एआय तंत्रज्ञानाचे धडे

    स्टार्टअप्स अंतर्गत एआयचे महत्त्व अन् भावी संधी विषयावर व्याख्यान

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क I

    येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या सहकार्याने आयोजित एआयचे महत्व अन् भावी संधी या विषयावरील व्याख्यानात विद्यार्थ्यांनी एआय तंत्राज्ञानाचे धडे गिरविले.

    गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या सहकार्याने स्टार्टअप्समध्ये एआयचे महत्त्व आणि भावी संधी या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील* हे उपस्थित होते तसेच *विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ, वैज्ञानिक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटरचे डॉ. आनंद शाक्य, एंजल इन्वेस्टर, लेखक व वक्ते कमलेश भगतकर, संस्थापक, पेक्स स्टार्टअपचे अजिंक्य तोतला, खान्देश इनक्युबेशनचे सीईओ सागर पाटील प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील, अधीष्ठाता प्रा. तुषार कोळी हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच गोदावरी आजींच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून झाली.

    प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर अजिंक्य तोतला यांनी उद्योजकीय प्रवास कथन करत विद्यार्थ्यांना कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवायच्या, अपयशातून धडा घेऊन यशस्वी स्टार्टअप्स कसे घडवायचे याबाबत उदाहरणे दिली. त्यांनी स्थानिक स्तरावर स्टार्टअप्स कसे उभारले जाऊ शकतात याची वास्तवदर्शी मांडणी केली. सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या इन्क्युबेशन सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आर्थिक मदत, उद्योगजगताशी जोडणारे नेटवर्किंग याबद्दल सविस्तर माहिती दिली.

    डॉ. आनंद शाक्य यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातील करिअरच्या असंख्य संधींचा त्यांनी आढावा घेतला. कमलेश भगतकर यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स व एआय यांची सांगड घालून राष्ट्रनिर्मितीमध्ये युवाशक्तीचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. सूत्रसंचालन व आभार तुळजा महाजन या विद्यार्थिनीने मानले. या उपक्रमा बद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

     

    AI technology Godavari Engineering jalgaon startups
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif