सीईटी’ व ‘जेईई साठी गोदावरी अभियांत्रीकीचे स्वतंत्र अ‍ॅप

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी अभियांत्रिकीने खास अ‍ॅप विकसित केले असून याचा सीईटी व जेईई तयारी करणा—या विदयार्थ्यांना फायदा होणार आहे.
एमएचटी—सीईटी/जेईई २०२३ ची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव यांनी पुर्वतयारी करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित केले आहे.

 

या अ‍ॅपच्या माध्यमातून विदयार्थी ३० मॉक टेस्ट देतील.यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांच्या प्रत्येकी दहा प्रश्नपत्रिका असून त्या सोडवल्यानंतर विदयार्थ्यांना परिक्षेतील गुण स्वता पाहता येणार असल्याने तयारी कुठपर्यंत पोहचली हे समजू शकेल व त्यात सुधारणा करता येईल.या मॉक टेस्टचे फायदे प्रत्यक्ष परीक्षेची पूर्व तयारी होते. परीक्षेसंबंधीची भीती जाते.अभ्यासाच्या उजळणी बरोबरच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.अभ्यासातील कमकुवत मुद्दा लक्षात येऊन त्याच्या सरावाची संधी मिळते.चांगल्या सरावाची संधी घरीच उपलब्ध होते. गुगल प्ले स्टोअरवर जीएफ सीईटी/जेईई या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

अभियांत्रिकी, अभ्यासक्रमात प्रवेश घेउ इच्छीत विदयार्थ्यांना २०२३ मध्ये एमएचटी सीईटी तसेच जेईई परिक्षा देतांना या अ‍ॅपमूळे निश्‍चीतच फायदा होवू शकेल. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी अ‍ॅप डाउनलोड करून फायदा घेण्याचे आवाहन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले आहे.गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजय पाटील व डॉ. नितीन भोळे यांच्या संकल्पनेतून हया अ‍ॅपची निर्मीती करण्यात आली आहे याचा विदयार्थ्यांना निश्‍चीतच फायदा होणार आहे. यापुढेही अत्याधुनिक सुविधा विदयार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी बोलून दाखवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.