देवासाठी आणला बोकड मात्र बिबट्यानेच केला भंडारा..

देवाला मान देण्यासाठी आणलेल्या बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या, त्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव, शहरांच्या वेशीवर पोहचला असून मानव-बिबट्या यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जिल्ह्यात हजारो हल्ले बिबट्यांनी केले आहेत. यात नागरिकांसह पशूधनाची हानी झालेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने बिबट्यांचा भद्रावतीत तांडा वस्तीमध्ये वावर आढळून येता आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. मानव-बिबट यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी ठोस धोरण आखण्याची सबंधित प्रशासनाला लक्ष द्यायची गरज आहे.

असाच प्रकार एका शेताकाऱ्यासोबत घडला. तांडा येथील गरीब शेतकरी युवक सोनु धारवत यांनी घरील देवादिकांच्या कार्यक्रमाकरीता दोन बोकड एक बकरी विकत घेतल्या होत्या. दरम्यान पहाटे अंदाजे ४ वाजता घरात शिरून त्या पशुधनावर बिबट्याने डल्ला मारून फडशा पाडला. प्राथमिक अंदाजाने सुमारे ६५ ते ७० हजार रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचे सोनु धारवत शेतकर्‍याकडून मिळालेल्या माहितीतून लक्षात येत आहे.

सदरील घटनेची माहीती शेतकर्‍याने वनविभाग दिली असता घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. बिबट्याची दहशत परीसरात पसरली असून झालेल्या नुकसानीची भरपाई वनविभागाने सबंधित प्रशासनाकडून देण्यात यावी तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी सोनु धारवत यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.