Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»डोंगर कठोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार
    अपघात

    डोंगर कठोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026Updated:February 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा परिसरात बिबट्याने बोकडावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरदा रस्त्यालगतच्या मोहाडी शिवारात मंगळवारी रात्री अंदाजे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राण्याने शेतकरी अरविंद सुरेश पाटील यांच्या मालकीच्या बोकडावर अचानक हल्ला चढवला. ही घटना गोविंदा बाळू बाऊस्कर (धनगर) यांच्या शेतात घडली. अचानक झालेल्या हल्ल्यात बोकड जागीच ठार झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांनी आरडाओरड केल्याने संबंधित प्राणी तेथून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

    घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांना देण्यात आली. त्यानंतर वनपरीक्षेत्रपाल (यावल पूर्व) स्वप्नील फटांगरे यांना कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याचे आदेश दिले. दि. १८ फेब्रुवारी रोजी वनपाल आय. एस. तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल तयार करून भरपाईसाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यावेळी वनरक्षक डोंगरे, पोलीस पाटील आर. आर. आढाळे, नुकसानग्रस्त शेतकरी अरविंद पाटील व वन कर्मचारी उपस्थित होते.

    दरम्यान, वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतात जाताना एकटे जाऊ नये, लहान मुलांना शेतात नेऊ नये, शक्यतो गटानेच शेतात जावे आणि रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू असून गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

    या घटनेनंतर डोंगर कठोरा व मोहाडी शिवार परिसरात घबराट पसरली असून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    #goat Forest Department Leopard Leopard attack mountain range Satpura Yaval Yaval Forest Department
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.