Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»सोमवारी राज्यभरात गो सन्मान अभियान!
    राष्ट्रीय

    सोमवारी राज्यभरात गो सन्मान अभियान!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments74 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गोमाता संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने अधिक कठोर भूमिका घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या सोमवार दि. 27 एप्रिल 2026 रोजी राज्यभर गो सन्मान अभियान राबविण्यात येणार आहे. मंडळस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत हे अभियान व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

    या अभियानामागे गोसंवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि शासनाचे लक्ष वेधणे हा मुख्य उद्देश आहे. कार्यकर्त्यांकडून गायीला राष्ट्रमाता तसेच राष्ट्रीय देवतेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करण्यात यावा, अशीही भूमिका मांडण्यात येणार आहे. देशभरात गोहत्येवर पूर्णतः बंदी घालण्यात यावी, ही या आंदोलनातील एक महत्त्वाची मागणी आहे. तसेच कृषी विद्यापीठांमध्ये शेण व गोमूत्र यावर संशोधनासाठी विशेष केंद्रे स्थापन करावीत, जेणेकरून पर्यावरणपूरक आणि पारंपरिक शेती पद्धतींना चालना मिळू शकेल, असेही निवेदनात नमूद केले जाणार आहे. याशिवाय गायीच्या दुधाला तसेच गोमूत्राला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल आणि गोपालन व्यवसायाला चालना मिळेल, असा यामागील उद्देश आहे. या अभियानात विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या सहभाग असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोणत्याही परिस्थिती हा कायदा लागू केला जाणार नाही!

    September 15, 2026

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif