Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»जिथे जमणार तिथूनच आपल्या भाषेच्या राज्यात परत जा!
    महाराष्ट्र

    जिथे जमणार तिथूनच आपल्या भाषेच्या राज्यात परत जा!

    “तिथे कमवा आणि खा” : अभिनेता हेमंत ढोमे का संतापला?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments173 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सरनाईकांनी दिला आहे. या निर्णयावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर मराठी सक्तीच्या विरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. यावर विविध मराठी कलाकार प्रतिक्रिया व्यक्ती करत आहेत. एकीकडे अभिनेता रितेश देशमुखने सरनाईकांच्या निर्णयाचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शिक हेमंत ढोमेनं संपावर जाणाऱ्या रिक्षाचालकांना सुनावलं आहे.

    हेमंत ढोमेची पोस्ट-

    ’15 लाख आहेत म्हणजे.. मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं.. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा,’ अशी पोस्ट हेमंतने लिहिली आहे. मराठी भाषा टिकली पाहिज, जगली पाहिजे आणि वाढली पाहिजे.. अशी हेमंतची आधीपासूनचीच भूमिका आहे. याच भूमिकेतून त्याने ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा मराठी शाळांबद्दलचा आशयघन आणि तितकाच मनोरंजक चित्रपट बनवला होता. त्यामुळे भाषा सक्तीविरोधात संपावर जाण्याला त्याने ठाम विरोध केला आहे.

    रितेश देशमुखनेही भाषा सक्तीचं समर्थन केलं आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्यच असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी जो काही हा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे”, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली आहे.

    राज्यात रिक्षा चालकांच्या परवान्यांची पुनर्तपासणी करताना कागदपत्रांसह चालक मराठी बोलतो की नाही, याचीही शहानिशा करण्याच्या सूचना प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिल्या आहेत. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासाठी भाजपने मराठी शिकवणी वर्गसुद्धा सुरू केले आहेत. काही रिक्षा चालकांनी त्यासाठी मराठी भाषेचे धडे घेण्यासही सुरुवात केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif