जगात कुठेही जा परंतु मराठी मातृभाषेला विसरू नका !

आज २७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस

0

 

लोकशाही विशेष लेख

मराठी भाषेचा गोडवा हा जगावेगळा असल्याचे जगजाहीर आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने “मराठी भाषा दिवस” म्हणुन साजरा केला जातो. या दिवसाला आगळे वेगळे महत्व असुन या दीवसाला जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन म्हणुनही साजरा केला जातो. मराठी भाषेतील अग्रगण्य व श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समिक्षक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२रोजी पुणे येथे झाला. त्यांनी अनेक माध्यमांच्या सहाय्याने मराठी भाषेचा जगभर प्रसार करून मराठी भाषेचे नाव लौकीक केले व गौरान्वीत केले. त्यामुळेच जगातील मराठी भाषीक २७ फेब्रुवारीला “जागतिक मराठी दिवस” म्हणुन साजरा करतात. मराठी भाषेचा गोडवा हा जगावेगळा आहे.

मराठी भाषा सोज्वळ, निर्मळ आणि सोपी असल्याने कोणीही तीला सहज अवगत करू शकते. महाराष्ट्राची मातृभाषा ही भारतासह संपूर्ण जगाला वेगळाच आनंद प्रदान करीत असते. मराठी भाषेत महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. याची जोपासना करण्याचे दायित्व संपूर्ण मराठी भाषीकांवर आहे. मराठी मांनसाचे कर्तव्य बनते की मराठी भाषा जगातील प्रत्येक मानसाच्या ह्रदयात व रक्तात कसे रूजवीता येईल याकडे सर्वांचे लक्ष असले पाहिजे. कारण ही मराठी भाषेची भुमी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, साधु-संत, थोर महात्मे, क्रांतीकारक, समाजसुधारक, जहालवादी, मवाळवादी यांच्या संकल्पनेतून व संस्कारातुनच मराठी भाषेचा उगम झालेला आहे. मराठी भाषेला जिवीत ठेवण्याचे काम वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी संपूर्ण ताकदीनिशी केले आणि जगभरात मराठीचा डंका वाजवीला. त्यामुळेच त्यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिवस म्हणुन साजरा केला जातो. या दिवसाला जगातील संपूर्ण मराठी भाषीक “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करतात.

आपल्या पुर्वजांनी मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी व मराठीचा ठेवा मजबूत करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. परंतु आताची नवीन पिढी मराठीचे मुळ शब्दच विसरल्याचे दिसून येते ही अत्यंत दुःखद बाब आहे. आई-बाबा, काका-काकु, मामा-मामी, आजी-आजोबा, माऊशी-माऊसा या शब्दाचा विसरपडुन मम्मी-पप्पा, अन्टी, डॅडी, ग्रॅडफादर-ग्रडमदर इत्यादी इंग्रजी शब्द मराठी भाषेत घर करतांना दिसत आहे. यामुळे मराठी भाषेतील अम्रृतवाणी नष्ट होवू शकते. याला नाकारता येत नाही. भारतात २८ राज्य ८ केंद्र शासीत प्रदेश आहेत. यामुळे भारताचा विचार केला तर १९५०० हुन अधिक मातृभाषा आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेसह अनेक भाषा आहेत. त्या शिकाव्या व अवगत कराव्यात परंतु आपल्या मातृभाषेला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी मुख्यत्वेकरून आजच्या पिढीने घेतली पाहिजे. आपल्यासाठी मराठी भाषा ही गंगेसारखी निर्मळ व तुळशीच्या वृक्षासारखी पवित्र आणि वटवृक्षासारखी अफाट भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेचा जेवढा प्रचार करतात येईल तेवढा केलाच पाहिजे. मातृभाषा मराठी ही आईची भूमिका बजावीत असते तर राष्ट्रभाषा हिंदी ही वडीलांची भुमिका पार पाडते. भारतात १९५०० पेक्षा अधिक मातृभाषा आहेत. परंतु या संपूर्ण भाषेमध्ये सोपी, सोज्वळ, मधुर आणि सहज अवगत होणारी एकमेव भाषा म्हणजे “मराठी भाषा”त्यामुळे आजच्या नविन पिढीला मी कळकळीची विनंती करतो की आपल्या मायबोली मराठीला न विसरता त्याची जोपासना केली पाहिजे. यातच महाराष्ट्राचा आणि मराठी भाषीकांचा गौरव आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. मराठी भाषा महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण जगाला सुशोभित करणारी भाषा आहे. मी नवीन पिढीला आग्रह करेल की कमीत कमी मराठी वृत्तपत्रे नेहमीच्या वाचनात आणावी यामुळे मराठी भाषेचा मान उंचावेल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा अभिमान संपूर्ण मराठी माणसाला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेला जीथे-जीथे रूजवीता येईल तीथे-तीथे रूजवुन मराठी भाषेला प्रज्वलीत करण्याचे काम आधुनिक युगात नवीन पिढीने केले पाहिजे. महाराष्ट्रातील कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो किंवा पंथाचा व्यक्ती असो तो मराठीचा सन्मानच करतो आणि केला पाहिजे. परंतु मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठीला जगभरात कशी सुर्यासारखी तेजस्वी करता येईल याकडे संपूर्ण मराठी भाषीकांनी लक्ष दिले पाहिजे व मराठी भाषेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरल्या गेले पाहिजे. याच मराठी भाषेने पोवाडा, कीर्तन, भजन, भारूड, लावनीच्या माध्यमातून इंग्रजांना सळोकीपळो करून लावले व समाज जागृतीचे काम केले.

आपण ज्या मातीत जन्म घेतला आणि ज्या भाषेच्या बळावर लहाण्याचे मोठे झालो. अशा मराठी भाषेचा प्रवास न थांबता संपूर्ण जगात झाला पाहिजे. तेव्हाच मराठी भाषेची मान आणखी उंचावेल व कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त खरी श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते. ज्या मातीत आपण जन्म घेतला तेथील भाषेची पुजाअर्चना व्हायलाच पाहिजे कारण ती आपणासर्वांसाठी पुज्यनीय आहे. आज दक्षिण भारतातील मातृभाषेचा विचार केला तर ती इतरांसाठी बोलायला व वाचायला अवघड व कठीण वाटते. त्यामुळे या भाषांचा प्रसार जास्त होवु शकला नाही. परंतु आज मराठी भाषा जगभरात ऐकायला व पहायला मिळते ही आनंदाची व गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषेचा विचार केला तर भारतातील काणा-कोपऱ्यातील व्यक्ती सहज अवगत करीत असतो. त्यामुळे देशातील इतर राज्यांतील लोक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळेच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मराठी भाषा सोपी, सोज्वळ, निर्मळ आणि शांत स्वरूपाची आहे. या वैभवशाली महाराष्ट्रातील मराठी भाषा संपुर्ण जगात आकाशातील चांदण्यांसारखी चमकायला पाहिजे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सर्वांना आग्रह करतो की माय मराठी, माझी मराठी, मी मराठी, मातृभाषा मराठी यापध्दतीने जोपासना व्हायलाच पाहिजे. कारण मराठी भाषा हा आपल्या पुर्वजांचा ठेवा आहे आणि ईश्वरी देण सुध्दा आहे. त्यामुळे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे. कारण मराठी भाषेचा इतिहास, संस्कृती, वारसा याला उंच शिखरावर नेण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. कारण जगात अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात जर आपण फिरायला निघालो तर प्रत्येक ४० किलोमीटर अंतरावर आपल्याला मराठी भाषेचा वेगवेगळा गोडवा दिसून येतो. कारण मराठीच्या प्रत्येक शब्दात मधुरता आणि सुसंगतपणा दिसून येतो. भारतासह संपूर्ण जगात सहज आणि सोपी भाषा असेल तर फक्त “मराठी भाषा”. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी मोराचा तुर्रा आहे तर जगाचा पीसारा आहे. त्यामुळे या गोडव्यामध्ये कुठेही खींडार पडणार नाही याची जबाबदारी भारतासह जगातील संपूर्ण मराठी भाषीकांनी घेतली पाहिजे.

आज जगात मराठी भाषेचा वेगळा ठसा उमटवीण्याची वेळ आली आहे. कारण आज मराठी भाषा नदीच्या प्रवाहासारखी जलदगतीने जगात प्रवेश करीत आहे व तीला समुद्रासारखे अफाट करण्याचे दायित्व संपूर्ण मराठी भाषीकांवर आहे. त्यामुळे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण शपथ घेवुया की मराठी भाषा जगभर पसरवीण्याकरीता आम्ही कटीबद्ध आहोत. मराठी भाषेला माझा मानाचा मुजरा. जगात वाढते प्रदुषण आणि निसर्गाचा होत असलेला ह्यास यामुळे पृथ्वीचे संतुलन दिवसेंदिवस डगमगत आहे. यामुळे भूकंप, सुनामी, अती उष्णता, अती थंडी, ग्लेशियर वितळने, समुद्राची पातळी वाढणे अशा अनेक भयावह घटना होत आहे. याला रोखण्यासाठी निसर्गाला वाचविणे अत्यंत गरजेचे आहे. याकरीता आजच्या दिवशी जगातील संपूर्ण मराठी भाषिकांनी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले तर एकाच दिवशी लाखो झाडे लावल्या जातील. यामुळे सर्वत्र हिरवागार गालिचा निर्माण होईल व यामध्ये आपल्याला मराठी भाषेचा वेगळाच आनंद, गोडवा व सुगंध अवश्य दिसून येईल व जगात मराठी भाषेची आगळीवेगळी प्रतीमा पहायला मिळेल आणि जगात एक चांगला संदेश जाईल. जागतीक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!जय हिंद!

 

रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर
मो.९९२१६९०७७९

Leave A Reply

Your email address will not be published.