जीएमसीच्या अधिष्ठातापदी डॉ. गिरीश ठाकूर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी (Govt Medical College, Jalgaon) लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गिरीश ठाकूर (Dr. Girish Thakur) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे अतिरिक्त अधिष्ठाता कार्यभार देण्यात आला आहे. असे आदेश बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा काढण्यात आले.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरात डॉ. जयप्रकाश रामानंद यांची धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी अतिरिक्त अधिष्ठाता म्हणून लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश राज्याचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.