जनआरोग्य; 33 वर्षीय व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल मध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण यशस्वी  

0

 लोकशाही विशेष लेख

 

१२  वर्षांपूर्वी झालेल्या वीजेच्या अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या ३३ वर्षीय राजस्थानी व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल येथे दुहेरी हात प्रत्यारोपण (Double arm transplant) शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ नीलेश सतभाई (Dr. Nilesh Satbhai), विभाग प्रमुख-प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांट सर्जरी, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीमने या रुग्णाला नवे आयुष्य बहाल केले. तब्बल १६ तास सुरु असलेली ही शस्त्रक्रिया डॉक्टरांकरिता एक मोठे आव्हान होते. या शस्त्रक्रियेने ग्लोबल हाँस्पिटल्सला एक नावलौकीक मिळाले आहे. १२ वर्षांपूर्वी अजमेर, राजस्थान येथील रहिवासी प्रेमा राम शेतात काम करत असताना चुकून विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने वीजेचा त्यांना जोरात झटका बसला. त्याला तातडीने अजमेर येथील रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याचे दोन्ही हात कापण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय त्यांना जयपूरला घेऊन गेले, पण त्यांनाही तसाच सल्ला देण्यात आला.

डॉ नीलेश सतभाई, विभाग प्रमुख-प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांट सर्जरी, ग्लोबल हॉस्पिटल मुंबई येथे गेले असता प्रेमा राम हा रुग्ण गेल्या दहा वर्षापासून नवीन हात शोधत होता. प्रत्योरापण नोंदणीनंतर काही काळ प्रतिक्षा केल्यानंतर एका दात्याचे अवयव रुग्णाच्या हाताच्या रंगांशी आणि आकाराशी जुळले. यापूर्वी युरोपमध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. पंरतू आशियातील मात्र दुहेरी हात प्रत्यारोपण झालेली ही पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. हात प्रत्यारोपण करणे खूप आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे होते. या प्रक्रियेदरम्यान, वेळ आणि समन्वय अतिशय महत्वाचा ठरला. जेणेकरून हातपाय शक्य तितक्या लवकर शरीराला जोडण्यात आले आणि त्वरीत रक्त परिसंचरण सुरू झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.