विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका द्या – कॉंग्रेसचे निवेदन

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका मिळावी यासाठी काँग्रेस पक्षातर्फे प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व खा.शि. मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांना निवेदन देण्यात आले.

संपूर्ण देशभरात पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रक्रिया जुलै महिन्याअखेर पर्यंत सुरू होतात. त्यासाठी अनेक विद्यार्थी ज्या विद्यापीठात प्रवेश हवा असतो त्या विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत सहभाग नोंदवून ती उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळवतात. त्या प्रवेश परीक्षेत अमळनेर येथील आमच्या माहिती प्रमाणे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना पदवी प्रवेशासाठी तृतीय वर्षाचे गुणपत्रक ३० जुलै पर्यंत सादर केल्यास त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. पण या प्रक्रियेसाठी तृतीय वर्षाचा निकाल लवकर लागून गुणपत्रक २८ जुलै पर्यंत मिळणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल यास खा.शि मंडळ जबाबदार राहील. परंतु प्रताप महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या परिक्षा नुकत्याच पार पडल्या असुन त्यांचा निकाल लेट जाहीर होईल असे लक्षात येते.

पदवी गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे समस्त विद्यार्थी व पालकांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर प्रताप महाविद्यालयाच्या कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील तृतीय वर्षाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन प्राचार्य डॉ. शिरोळे तसेच खा.शि. मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाला देण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, प्रा राहुल भदाणे, सामर्थ्य प्रतिष्ठान चे संचालक अमोल माळी सर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन मोरे, रऊफ पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.