Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून पुष्पगुच्छ नव्हे, प्रेरणादायी पुस्तके द्या ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
    जळगाव

    जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून पुष्पगुच्छ नव्हे, प्रेरणादायी पुस्तके द्या ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 17, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हाधिकाऱ्यांना भेट म्हणून पुष्पगुच्छ नव्हे, प्रेरणादायी पुस्तके द्या ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    जळगाव प्रतिनिधी
    नागरिकांच्या आणि प्रशासकीय कामकाजाच्या हितासाठी तसेच वाचन संस्कृती वृध्दीगंत होण्यासाठी प्रोत्साहन जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या भेटीप्रसंगी किंवा औपचारिक कार्यक्रमांमध्ये भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक पुस्तके भेट देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांना करण्यात आले आहे.

    या उपक्रमातून मिळालेली पुस्तके शासकीय ग्रंथालये आणि शाळांमध्ये जमा करण्यात येणार असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मिळणार आहे. पुस्तके ही कायमस्वरूपी आणि अर्थपूर्ण भेट ठरून वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

    भेट देण्यासाठी पुस्तके निवडताना ती दर्जेदार, प्रेरणादायी आणि सर्व वयोगटांसाठी उपयुक्त असावीत. पुस्तक भेट देताना त्यावर आपले नाव, तारीख आणि छोटा संदेश लिहिणे ऐच्छिक आहे, ज्यामुळे ती भेट अधिक वैयक्तिक आणि स्मरणीय होईल. या उपक्रमात सहभागी होऊन वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

    jalgaon Rohan Ghuge
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif