गिरणा नदीत एकाचा बुडून मृत्यू… कारण वाचून थक्क व्हाल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहराजवळ असलेल्या गिरणा नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. राजू भूरा भिल (३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. पात्रात पोहतांना फिट आल्याने तरूणाची पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, राजू भिल हा तरूण आपल्या परिवारासह पिंपळकोठा येथे वास्तव्याला होता. त्याला फिट येण्याच्या आजाराने ग्रस्त होता. दरम्यान रविवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता, त्याला पोहतांना अचानक फिट आले. त्यामुळे त्याला पाण्याबाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर महाजन, नरेंद्र पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.