Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या
    • मुलींना जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मिळणार रु. 1.01 लाख
    • अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
    • प्रवासी बस उलटटून थेट खड्यात : 12 प्रवाशांचा मृत्यू
    • तिला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर मारली उडी अन्…
    • वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार!
    • अखेर टप्पा चौकात सिग्नल कार्यान्वित : नागरिकांना दिलासा
    • “मी रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणारच नाही!”
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»सुटकेसमध्ये आढळला रक्ताळलेला चिमुकलीचा मृतदेह
    गुन्हे वार्ता

    सुटकेसमध्ये आढळला रक्ताळलेला चिमुकलीचा मृतदेह

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राजधानी दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये मृतहेद आढळला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच नाही तर, चिमुकलीवर बलात्कार झाल्याची देखील शक्यता याठिकाणी वर्तवण्यात येत आहे. पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्तर पुर्व दिल्लीच्या दयालपूर भागात डी ब्लॉकमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली घरातून चुलतीला बर्फ देण्यासाठी निघाली होती. पण फार उशीर झाला तरी मुलगी घरी परतली नसल्यामुळे कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास ती परत न आल्याने नातेवाईकांनी चौकशी केली. मुलीचा शोध लागत नसल्यामुळे कुटुंबियांची देखील चिंता वाढली.

    चौकशी दरम्यान मुलीला एका बंगल्याकडे जाताना पाहिलं… असं एका व्यक्तीने सांगितलं. अशा माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित बंगल्याकडे धाव घेतली. मात्र, बंगल्याला कुलूप होतं.

    कुलूप तोडून आत गेल्यानंतर सर्वात अगोदर नातेवाईकांना मुलीचे कंबरेखालचे कपडे सापडले. नातेवाईकांना मुलगी अत्यंत वाईट अवस्थेत आढळली. शोध घेतल्यानंतर एका सुटकेसमध्ये मुलगी रक्तातने माखलेली मिळाली. मुलगी मिळताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मुलींना मृत घोषित केलं. सध्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांची 6 पथकं तात्काळ आरोपीला शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. मुलीला वाईट अवस्थेत पाहिल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात येत असून पोलीस प्रत्येक पैलू बारकाईने तपासात आहेत.

    प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची देखील मदत घेत आहेत.या संदर्भात, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, दयालपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध POCSO कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    तिला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर मारली उडी अन्…

    August 16, 2026

    वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार!

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif