आठवीच्या मुलीवर शाळेत बलात्कार; दोन विद्यार्थी ताब्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात (Maharashtra) महिला सुरक्षेचा (Women’s safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तर शाळा (School) देखील विद्यार्थीनींसाठी सुरक्षित नाहीत. मुंबईमधून (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी शाळेतच बलात्कार (Girl Raped In School) केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केला. माटुंगा (Matunga) येथील शाळेत 30 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. वर्गातील सर्व मुले-मुली नृत्य सरावासाठी बाहेर गेल्यानंतर, या दोन मुलांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत मुलीवर लैंगिक अत्याचार केला. असे माटुंगा पोलिसांनी म्हटले आहे. या धक्कादायक प्रसंगामुळे धक्का बसलेल्या मुलीने घडलेला प्रसंग आपल्या कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या घरच्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांना दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376 (D) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलांना बाल न्यायालयापुढे सादर केल्यानंतर त्यांना डोंगरी येथील बाल सुधारगृहात रवानगी पाठवण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.