लासगाव येथे सर्प दंशाने बालिकेचा मृत्यू

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

लासगाव तालुका पाचोरा येथे देशमुख नगर येथे राहणारे बाबू आजम शेख यांची मुलगी  मुमताज ही सकाळी दहा वाजता कपडे धुऊन घराच्या मागच्या बाजूला कपडे वाळवण्यासाठी कपडे टाकत असताना काळ्या रंगाच्या कोब्रा जातीच्या (नाग) सापाने मुलीला दंश केला.

दरम्यान त्या मुलीला नांद्रा येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सर्पदंश प्रतिबंधक लस टोचली. लागलीच तिला जळगाव येथे ॲम्बुलन्सने रवाना केले असता वाटेतच तिची जीवन ज्योत मावळली. सर्प जास्त विषारी असल्यामुळे किंचित लोक वाचतात असे सर्पमित्राने सांगितले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.