Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रोडरोमियाच्या जाचाला कंटाळून ११ वीतील मुलीची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    रोडरोमियाच्या जाचाला कंटाळून ११ वीतील मुलीची आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 10, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तरुणाच्या जाचाला कंटाळून जालनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे ही घटना घडली. अकरावीमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आज सकाळी ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास जालना पोलिसांकडून सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये तरुणाच्या छेडछाडीला आणि धमक्यांना कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. अकरावीमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

    आरोपी तरुणाकडून रस्त्यावर सतत आडवून होत असलेली छेडछाड तसेच धमक्यामुळे या तरुणीने ३ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली होती. मात्र तरुणीचे काही फोटो आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

    सततच्या धमक्या आणि छेडछाडीला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणात मोठे रॅकेट असून अनेक मुलींना अशाप्रकारे त्रास होत असल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या आजोबांनी केला आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #roadromio Jalana Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif