‘त्या’ ऑडिओ क्लीपवर गिरीश महाजनांचा खुलासा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हा परिषदेतील भरतीबाबत (ZP Recruitment Exam) युवकाशी अर्वाच्च भाषेत संवाद साधल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल (Viral Audio Clip) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत अजून सत्यता उघड झाली नसून महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रकरणी आता गिरीश महाजन यांनी खुलासा केला आहे.

लवकर निर्णय घ्या

ऑडिओ क्लीपमध्ये बुलढाणा येथील एका विद्यार्थ्यानं जिल्हा परिषदेच्या जागेसाठी लवकर परीक्षा घेण्याची मागणी गिरीश महाजन यांच्याकडे फोनवरुन संवाद साधताना केली. “ही परीक्षा होत नसल्यानं विद्यार्थी खूपच नैराश्यात गेले आहेत, त्यामुळं भरती संदर्भातील फाईलवर लवकर निर्णय घ्या,” अशी विनंती  विद्यार्थ्याने महाजन यांना केली.

फोन ठेव

यावर अर्वाच्च भाषेत बोलत गिरीश महाजन म्हणतात, “कामं नाही का रे तुम्हाला काही सणासुदीचं. दिवसभरातून ५०० फोन लावता. काही करत नाही मी, रद्द झाली ती परीक्षा. रद्द केली. फोन ठेव”

आमच्या मंत्रालयाशी काहीही संबंध नाही

अशा संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खुलासा देतांना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रियेचा आमच्या मंत्रालयाशी काहीही संबंध नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र काही जण आपल्याला मुद्दा टार्गेट करत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.