खडसे म्हणाले,”..मिटवून टाकू”, महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. दरम्यान खडसे हे भाजपमध्ये पुन्हा परत येत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण खडसेंनी याचे खंडन केलं होतं. मात्र आता मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan)  यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मोठा गौप्यस्फोट

मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, नाशिकच्या सभेत एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना (DYCM Devendra Fadnavis) आणि मला एक विषय मिटवून टाकू असं सांगितलं होतं. पण गर्दीत तो विषय कोणता? हे मात्र आम्हाला कळलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट महाजनांनी केला.

राजकारणात पुन्हा खळबळ

तसेच खडसे यांच्या मनामध्ये काय चाललंय? त्यांना कोणतं प्रकरण मिटवायचं आहे? हे सगळं कार्यक्रमात गर्दी असल्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. मात्र महाजनांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली असून असं काय प्रकरण आहे जे एकनाथ खडसेंना महाजन-फडणवीस या दोघांसोबत बसवून मिटवायचं आहे, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

कोणता विषय मिटवायचा

नाशिकच्या महानुभाव पंथाचा तो कार्यक्रम होता. सभेतलं भाषण संपल्यावर एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. मंत्रीमंडळ विस्तार बाकी असल्याने बसायचा विचार करु, असे खडसेंना म्हणाल्याचंही महाजनांनी सांगितलं. पण खडसेंना नेमका कोणता विषय मिटवायचा आहे, हे मला माहिती नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.