नोटबंदीमध्ये तुम्ही केलेले धंदे मला माहितीय; महाजनांचा खडसेंना इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नोटबंदीच्या काळात तुम्ही काय धंदे केले, हे सर्व मला माहिती असून, बोलण्यास भाग पाडू नका, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

कशा कशा नोटा बदलल्या

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात मतदारांचा प्रचार मेळावा झाला. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. गिरीश महाजन यांनी म्हटले की, एकनाथ खडसे माझ्यावर आरोप करतात. मात्र माझ्याकडे बोट दाखवताना चार बोटे त्यांच्याकडेच आहेत. नोट बंदीच्या काळात त्यांनी काय काय केलं कुठे कुठे आणि कशा कशा नोटा बदलल्या हे सर्व मला माहीत आहे. मात्र ते बोलायला लावू नका असा थेट इशारा महाजन यांनी खडसे यांना दिला.

दूध संघामध्ये निवडून येऊन दाखवाच

दूध संघामध्ये तुम्ही काय काय केले आहे हे सर्वजण जाणून आहे. सत्तेचा गैरवापर हा बरा नसतो असा टोला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांना नाव न घेता लगावला. तुम्ही दूध संघामध्ये निवडून येऊन दाखवाच असे आव्हानही त्यांनी केले. खडसे हे त्यांच्या नशिबाचे भोग भोगणार आपण काय काय करून ठेवले आहे हे लवकरच कळेल. धमक्याच्या माध्यमातून आपणच सर्व पदे आपल्या घराण्यात ठेवले. तुम्ही काय माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करताय कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष पद स्वीकारले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.