Friday, May 20, 2022

‘अमोल मिटकरी जिभेला हाड नसलेला आमदार’- गिरीश महाजनांची टीका

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले हास्य आवरले नाही.

- Advertisement -

ब्राह्मण महासंघ आणि भाजपने मिटकरी यांचा तिव्र शब्दांत विरोध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. या दरम्यान, माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी अमोल मिटकरी यांच्यावर कठोर टीका केली.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन

आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान विविध कामांचे उदघाटन करण्यात येणार आहे, यासाठी जळगावातील शिवतीर्थ मैदानावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षकांसह माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवतीर्थ मैदानावर पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना अमोल मिटकरींवर सडकून टीका केली.

“अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये”, अशी टीका अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी टीका केली.

तसेच गिरीश महाजन यांनी यावेळी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारवर टीका केली. “तीनही पक्षांचे तोंड तीन बाजूला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयी राज्य सरकारचे एकमत होत नाही. आतापर्यंत अशी स्थिती राज्याची कधी नव्हती व इतके वाईट दिवस राज्याला कधी आले नाही”, अशी टीका महाजनांनी केली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या