मंत्री गिरीश महाजन त्यांच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न, पण वेळीच टाळला अनर्थ

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक मधील भूमी अभिलेख विभागाच्या घाणेरड्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमवण्याची वेळ आल्यामुळे संबंधित विभागाडून न्याय मिळाला नाही. म्हणून चांदवड तालुक्यातील योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी खताळ यांनी गेल्या ४० दिवसापासून येथील महसूल आयुक्त कार्यालय समोर उपोषण सुरु केले आहे. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर या दोघं-भाऊ बहिणींनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर मंत्री गिरीश महाजन त्यांच्या समोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु त्या अगोदरच या दोघ-भाऊ बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी हे दोघे गेल्या ४० दिवसापासून येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. परंतु ४० दिवस उपोषणाला बसून सुद्धा कोणी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. परंतु संतप्त झालेल्या दोघं-भाऊ बहिणीने आज स्वातंत्र दिनाच्या दिवशी महसून आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन हे झेंडावंदन करण्यात येणार असल्याने त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.