जे तुम्ही पेराल तेच उगवेल; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडी घडत आहेत. यावर आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.

..म्हणून थेट ईडीच त्यांच्या घरी

गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा येत होत्या, वारंवार बोलावणं पाठवून देखील ते टाळाटाळ करत होते.  त्यांना ईडी कार्यालयात जाण्यास त्रास होता म्हणून थेट ईडीच त्यांच्या घरी गेली. ही चौकशी सकाळी साडेसात वाजेपासून सुरु आहे. तरीही ते ट्विट करून सांगत आहे की, मी किती शुद्ध आहे, माझा काहीही गुन्हा नाही,  बाळासाहेबांची शपथ घेऊन ते सांगत आहेत की, या घोटाळ्याशी माझा काडीमात्र सबंध नाही. मला वाटतं की,  या चौकशीवरून तुम्हाला काही शपथ वैगेरे घेण्याची गरज नाही. जर तुम्ही धुतल्या तांदळासारखे असाल तर चौकशीला जायला काही हरकत नाही. अशी प्रतिक्रिया आ. गिरीश महाजन यांनी दिली.

ते घाबरत आहेत

तसेच ते म्हणाले की, जर तुम्ही स्वच्छ असाल, तुमच्याकडे काही कागदपत्रेच नसतील, तुमचे काही ट्रान्झेक्शन झाले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. ते ज्याप्रकारे सांगताय की, मी किती शुद्ध आहे, ते एक प्रकारे घाबरत आहेत. चौकशी अंती जे सर्व समोर येईल ते आपल्याला कळेल तेव्हाच ही कारवाई होईल. अन्यथा कारवाई होणार नाही.

ही कारवाई अत्यंत रीतसर

तत्कालीन जे संचालक मंडळ होतं ते शासनाने बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासक बसवले आहेत. पण या दूध संघाबद्दल अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी लोकांनी केल्या आहेत. उच्च न्यायालयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते गेले आहेत. म्हणून दीड वर्ष झाले तुमची मुदत संपली आहे.  म्हणून शासनाने प्रशासक मंडळ बसवले आहे. मला वाटतं ही कारवाई अत्यंत रीतसर आहे.

..म्हणून आता उगवायची वाट पहा

परंतु आम्हाला नोकर भारती करायची आहे, अनेक लोकांकडून आम्ही एडव्हान्स घेऊन ठेवला आहे. अनेक गरीब आणि शेतकरी लोकांच्या मुलांकडून २०- २५ लाख रुपये घेऊन ठेवले आहेत , अशा अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात तथ्य आहे. म्हणून सर्व तक्रारींची चौकशी व्हावी अशा अनुषंगाने त्याठिकाणी चौकशी समिती देखील नेमली आहे. प्रत्येकाला वाटतं मी इतका पवित्र आहे, शुद्ध आहे तर त्यांनी चौकशीला सामोरे जावं आणि  नंतर बोलावं.  या अडीच वर्षात तुम्ही काय काय केलं ?. जसं तुम्ही पेराल तसेच उगवेल म्हणून आता उगवायची वाट पहा. असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांचे नाव घेता लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.