
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील शहरातील सर्वात पहिला व नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या रोटरी क्लब जळगावच्या अध्यक्षपदी गिरीश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. मानद सचिव म्हणून सुभाष अमळनेरकर आणि सचिव (कम्युनिकेशन) म्हणून पंकज व्यवहारे यांची निवड करण्यात आलेली आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या रोटरी वर्ष २०२५ – २६ साठी हे नूतन पदाधिकारी कार्यरत राहतील.गिरीश कुलकर्णी हे २००९ पासून रोटरीत सक्रिय असून त्यांनी पर्यावरण, प्रोग्राम, लिटरसी, पब्लिक इमेज या समित्यांसह क्लबचे मानद सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
सुभाष अमळनेरकर हे गेली १४ वर्षांपासून रोटरीत कार्यरत असून त्यांनी ग्रीटिंग,पर्यावरण, अटेंडन्स या समित्यांचे चेअरमन म्हणून प्रत्येकी दोन वर्ष कार्य केले आहे. पंकज व्यवहारे हे २०१८ पासून रोटरी क्लब जळगावचे सदस्य असून इंटरॅक्ट, रोटरॅक्ट, लिटरसी, ई – लर्निंग या समित्यांच्या कार्यात त्यांनी योगदान दिलेले आहे. याच महिन्यात होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यात नूतन पदाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारतील असे पब्लिक इमेज कमिटी चेअरमन राजेश यावलकर यांनी कळविले आहे.

