घुसर्डी खुर्द नवनिर्वाचित उपसरपंचपदी पुनम परदेशी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील घुसर्डी खुर्द ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत उपसरपंचपदी पुनम जितेंद्र परदेशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. आश्विनी रामेश्वर पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने याउप सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचीत उपसरपंच पुनम परदेशी यांचा उपस्थित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

यावेळी सरपंच प्रमिलाबाई प्रताप परदेशी, मावळत्या उपसरपंच आश्विनी रामेश्वर पाटील, रविंद्र कपुरचंद परदेशी, भिमराव काशिनाथ भिल्ल, मंगलाबाई प्रकाश पाटील, मोनाली मधुकर पाटील, कमलाबाई गोकुळ पाटील, कमलाबाई घमा भिल्ल यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामसेवक कृष्णा पाटील यांनी निवडीचे कामकाज पाहीले.

नवनिर्वाचीत उपसरपंच घुसर्डी खुर्द येथील माजी सरपंच रायचंद परदेशी यांच्या स्नुषा आहेत. तर नवनिर्वाचित उपसरपंच पुनम परदेशी हया पिंप्री.बु. प्र. भ. ता. पाचोरा, जि. जळगाव येथील टेक्नीकल माध्यमिक विदयालयाचे उपशिक्षक जितेंद्र रायचंद परदेशी यांच्या पत्नी आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.