लोकशाही न्युज नेटवर्क
आयआयएम कलकत्ताच्या ई सेलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिपची प्राथमिक फेरी २० ते २८ जानेवारी दरम्यान जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए विभागाद्वारे यशस्वीरित्या पूर्ण झाली. यावेळी बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी बिजनेस अॅनालिटिक्सची उद्दिष्टे समजून घेण्यासाठी एक ओरिएंटेशन सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी एमबीए विभागातील ४१ विद्यार्थ्यांनी “बिजनेस अॅनालिटिक्स” च्या 30 तासांच्या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. या अनुषंगाने प्रसिध्द उद्योजक व आयएमएचे प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल व व्यावसायिक प्रशिक्षक नासेर घांजेनफेर यांनी विद्यार्थ्यांना बिजनेस एनालिस्टवर मार्गदर्शन केले.
त्यांनी यावेळी बिझनेस अॅनालिटिक्स, व्हिज्युअल अॅनालिटिक्स, डीस्क्रिप्टिव्ह आणि प्रिस्क्रिप्टिव्ह अॅनालिसिस, रीकमेंडेशन इंजिन, मार्केट बास्केट अॅनालिसिस, प्रेडिक्टिव अॅनालिसिस, लॉजिस्टिक मॉडेल वापरून क्रेडिट रिस्क मॉडेल, डेटा मायनिंग आदींवर मार्गदर्शन केले. जळगाव येथे उद्योजक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मेक इंटर्न-ऑफिशियल ट्रेनिंग पार्टनरने आयआयएम कलकत्ताच्या ई-सेलसोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील सादरीकरणाच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेल्या चार विध्यार्थ्यांना व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. कौस्तव मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. या आयआयएमच्या बिजनेस प्लॅन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी इन्स्टिट्यूट इंडस्ट्री इंटरअॅक्शन सेलच्या डीन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. रोहित साळुंखे व विद्यार्थी समन्वयक लोकेश पारेख यांनी समन्वय साधले. तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.