लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल तंत्रज्ञान प्रचंड पुढे गेले आहे. रोज नवनवीन शोध लागत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘घिबली’ ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. सेलिब्रिटींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बडे स्टारकास्ट, पत्रकार आणि असंख्य युजर्सची घिबली स्टाईल इमेज आता सोशल मीडियावर दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘#ghibli’ हा ट्रेंड सुरु आहे. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप या सर्व प्लॅटफॉर्मवर फक्त याच कलाकृतीचे फोटो पाहायला मिळत आहेत. पण ‘घिबली स्टाईल’ म्हणजे नेमकं काय आणि हे फोटो कसे तयार करायचे ते पाहुयात.

‘घिबली’ म्हणजे काय ?
“घिबली” हे नाव इटालियन भाषेतील एका शब्दावरून आलं आहे, ज्याचा अर्थ “सहारा वाळवंटातून वाहणारा गरम वारा” असा होतो. ‘घिबली’ हा जपानमधील एक प्रसिद्ध अॅनिमेशन फिल्म स्टुडिओ असून, हे पारंपरिक हाताने काढलेल्या अॅनिमेशन तंत्रावर जास्त भर देतं.

‘घिबली’ कोणी बनवले?
एआय चॅटबॉट चॅटजीपीटी 4ओ मध्ये लोकांसाठी घिबली स्टाईल इमेज फीचर समाविष्ट केले आहे, या फीचरने लोकांना काही वेळातच वेड लावले आहे. सध्या, हे वैशिष्ट्य ChatGPT Plus, Pro, Team सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, ‘एआय जनरेटेड इमेजेसना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, सध्या हे फीचर मोफत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की हे एआय फीचर लवकरच मोफत वापरकर्त्यांसाठी देखील आणले जाऊ शकते’.

ChatGPT वापरून Ghibli स्टाइल इमेज कशी बनवायची ?
1. ChatGPT उघडा व नवीन व्हर्जन सुरू करा.
2. प्रॉम्प्ट बारवरील तीन डॉट्स क्लिक करा – तिथे “Image” पर्याय निवडा.
3. आता तुम्हाला हव्या असलेल्या इमेजचे वर्णन द्या.
4. इमेज तयार झाल्यावर डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.
OpenAI ने GPT-4o मध्ये सुधारणा केल्या असून, नवीन मॉडेल अधिक अचूक आणि संदर्भानुसार इमेज तयार करू शकते.
मोफत AI टूल्स वापरून Ghibli इमेज
ChatGPT व्यतिरिक्त, Craiyon, Playground AI, Grok आणि Deep AI सारख्या मोफत प्लॅटफॉर्मवरूनही घिबली स्टाइल फोटो बनवता येतात. फक्त मजकूर लिहा किंवा फोटो अपलोड करा, बाकी AI करेल. मात्र, GPT-4o प्रमाणे हे टूल्स अगदी हुबेहुब फोटो तयार करू शकत नाहीत. यामध्ये तुम्हाला थोडासा वेगळा फरक दिसून येतो.

