‘अमृत’ योजनेतर्गंत नळकनेक्शन देण्याचे धोरण अद्याप ठरले नाही, रस्ते करण्यास अडथळे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमृत योजना (Amrit Yojana) हि बऱ्याच वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. आणि त्या योजनेमुळे सर्वांच्याच घरात २४ तास पाणी उपलब्ध राहील असे सांगण्यात आले होते. पण ‘घरकुल’ (Gharkul Yojana) योजनेतील घरासाठी ‘अमृत’ योजनेतर्गंत नळकनेक्शन देण्याचे धोरण न ठरल्यामुळे या भागात अद्यापही नळकनेक्शन झालेली नाहीत. त्यामुळे या भागात रस्ते करण्यासही अडथळे येत आहेत. पिंप्राळा शिवारातील हुडको घरकुलमधील रस्त्यांसाठी मंजूर झालेला १ कोटी २० लाखांचा निधी न वापरल्याने परत जाण्याच्या मार्गावर आहे. शहरात झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी राबविलेल्या घरकुल योजनेतील रहिवाशांना ‘अमृत’ योजनेंतर्गत नळकनेक्शन देण्याचे धोरण महापालिकेतर्फे ठरविण्यात येणार होते. मात्र, ते अद्यापही ठरलेले नाही.

त्यामुळे या भागात ‘अमृत’चे नळकनेक्शन अद्यापही पोहोचलेले नाही. परिणामी, आता या भागात रस्ते करण्यासही अडथळे येत आहेत. कारण रस्ते केल्यास अमृत नळकनेक्शनसाठी पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत. पिंप्राळा हुडको घरकुलात ही समस्या झाली आहे. पिंप्राळा हुडकोमधील रस्ते व गटारींसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.या निधीतून आरसीसी गटारी व काँक्रिट रस्ते हुडकोत तयार करण्यात येणार होते. मात्र, रस्ते तयार करण्यापूर्वी रहिवाशांनी अमृत योजनेचे नळकनेक्शन घेणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेकडून हुडकोतील रहिवाशांना थकबाकी भरून नळकनेक्शन घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, घरकुलधारकांनी महापालिकेने आकारलेल्या पाणीपट्टीला विरोध दर्शविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.