जळगावात बंद घर फोडून सोन्याचे-चांदीचे दागिने आणि दुचाकी चोरीला

0

जळगावात बंद घर फोडून सोन्याचे-चांदीचे दागिने आणि दुचाकी चोरीला

जळगाव, ;- शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दुचाकी चोरल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनकर खेमचंद पाटील (वय ४३, रा. माऊली नगर, कोल्हे हिल्स, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत व खाजगी नोकरी करत आहेत. २१ ते २२ एप्रिलदरम्यान त्यांच्या घरी कोणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून त्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि एमएच १९ बीटी २२६७ क्रमांकाची दुचाकी असा ऐवज चोरून नेला.

ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली. दिनकर पाटील यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.