Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात भरदिवसा चोरी
    गुन्हे वार्ता

    दर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात भरदिवसा चोरी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 23, 2025No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात भरदिवसा चोरी

    शिव कॉलनीतील अपार्टमेंट फोडून १.४८ लाखांचा ऐवज लंपास; रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल

    जळगाव : देवीच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील वाघोदा येथे गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष रघुनाथ महाजन (वय ७२, रा. राधा रमण अपार्टमेंट, शिव कॉलनी) यांच्या बंद घरावर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारत रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २० डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    शहरातील शिव कॉलनी येथील राधा रमण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये सुभाष महाजन हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ते आपल्या मूळ गाव वाघोदा (ता. रावेर) येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप गायब असल्याचे आढळून आले. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, हॉलमधील कॉटवर लोखंडी कपाटातील चिल्लरचा डबा पडलेला दिसून आला. यामुळे घरात चोरी झाल्याची खात्री झाली.
    लॉकर तोडून दागिन्यांची चोरी
    त्यानंतर महाजन कुटुंबियांनी घरातील इतर खोल्यांची पाहणी केली असता, लोखंडी कपाट उघडे असून त्यातील लॉकर तोडण्यात आल्याचे आढळले. लॉकरमध्ये ठेवलेले लग्नातील सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
    चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज
    चोरट्यांनी घरातून चार हजार रुपयांची रोख रक्कम, २४ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ३६ हजार रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले, दीड हजार रुपये किमतीची चांदीची साखळी, दीड हजार रुपयांच्या चांदीच्या अंगठ्या तसेच एक हजार रुपये किमतीचे चांदीचे करधोडे असा एकूण १ लाख ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
    सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू
    घरफोडीची खात्री झाल्यानंतर महाजन यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत पुरावे गोळा केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून त्याच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon घरफोडी
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif