Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावमध्ये बंद घर फोडले ; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास
    गुन्हे वार्ता

    जळगावमध्ये बंद घर फोडले ; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावमध्ये बंद घर फोडले ; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

    जळगाव : शहरातील खोटेनगर परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरमालक देवदर्शनासाठी नेपाळ येथे गेले असतानाच चोरट्यांनी संधी साधत ही घरफोडी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    खोटेनगर येथील रहिवासी योगिराज पुंडलिक पाटील हे १० डिसेंबर रोजी पत्नीसमवेत नेपाळ येथे देवदर्शनासाठी रवाना झाले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घराची देखरेख करण्याची जबाबदारी भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील घराची पाहणी करण्यासाठी गेले असता, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

    आत जाऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडलेले असून, चोरट्यांनी १० हजार रुपये रोख तसेच सोन्याचे दागिने असा सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif