सुप्रीम कॉलनी परिसरात बंद घर फोडून ऐवज लंपास

0

सुप्रीम कॉलनी परिसरात बंद घर फोडून ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार रविवारी दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समोर आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ मुराद खाटीक (वय ५२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचे घर १३ ते १४ डिसेंबर या कालावधीत बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेज कपाट उघडून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य साहित्य असा ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

रविवारी दुपारी घर उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण चौधरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.