चाळीसगाव तालुक्यात तळेगाव येथे घरफोडी; ७४ हजारांचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव तालुक्यात तळेगाव येथे घरफोडी; ७४ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी):

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव अर्जुन शिंगाडे (रा. तळेगाव) हे २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपले होते. त्यांच्या आई-वडिलांनी अंगणात विश्रांती घेतली होती. मध्यरात्री २ वाजता शिंगाडे मोबाइल चार्जिंगसाठी घरात आले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. किचनच्या दरवाजाची कडी तुटलेली होती आणि बेडरूममधील कपाटातील साहित्यही विखुरलेले होते.

चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ३४ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये असा एकूण ७४ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले. हा प्रकार २७ मार्च रात्री ११.३० ते २८ मार्च मध्यरात्री २ वाजेदरम्यान घडला.

या चोरीप्रकरणी उद्धव शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार राजेश रावते करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.