जळगाव;- शहरातील भोईटे नगर परिसरातून घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील एक लाख रुपये किमतीच्या चार पोते भरलेल्या 200 किलो तांब्याच्या वायरी 35 हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ ते ८ रोजीच्या दरम्यान घडली असून हा प्रकार ८ रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला. या प्रकरणी केतन भागवत सरोदे रा. भोईटे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहे.
Trending
- गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
- ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
- इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
- शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
- एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
- गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
- रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
- गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

