जळगाव;-सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना दुखावणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी एकावर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिवाजीनगर हुडको परिसरात राहणारे प्रशिक दीपक ससाने वय 18 यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे की, संशयित अक्षय दिलीप ठाकूर व 28 राहणार शिवाजीनगर नवीन हुडको याने सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंट वरून भावना दुखावणारे पोस्ट वायरल केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय किशोर पवार करीत आहे.