Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»गायत्री भंगाळे यांना दणका!
    संपादकीय

    गायत्री भंगाळे यांना दणका!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 26, 2026Updated:April 27, 2026No Comments893 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    भुसावळ पालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात वैध प्रमाणपत्र समितीकडून अवैध घोषित करण्यात आले आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी जात वैध प्रमाणपत्र समितीने हा निर्णय जाहीर केला. अगदी निवडणूक काळापासून गायत्री भंगाळे यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. परंतु गौर समाजाचे जातीचे प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीपूर्वी दाखल करून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत रजनी सावकारे यांचे विरोधात निवडणूक लढवून त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जिंकूनही आल्या होत्या. दरम्यान निवडणूक झाल्यापासून विरोधकांकडून त्यांना कोणतेही काम करणे मुश्किल केले होते. जेवढ्या काही सभा झाल्या त्या सभेचे जे विषय पत्रिकेवर विषय ठेवण्यात आले होते, त्या विषयांना विरोधकांकडून म्हणजे भाजप युतीकडून एकही विषय मंजूर होऊ दिला नाही. नंतर ज्या सभा घेण्यात आल्या त्या सभा कोअर अभावी तहकूब करण्यात आल्या. त्यातल्या त्यात माजी आमदार संतोष चौधरी यांची स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्यानंतर विरोधकांच्या विरोधाची धार आणखीच तीव्र झाली होती. कारण गायत्री भंगाळे जरी नगराध्यक्ष अससल्या तरी संतोष चौधरी हेच नगराध्यक्ष म्हणून भुसावळचा कारभार करीत आहेत, असा समज विरोधकांचा होऊन त्याला तीव्रपणे विरोध करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली होती. दरम्यानच्या काळात गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र विरुद्ध जे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप रजनी सावकारे, राजू तायडे आणि प्रमोद सावकारे यांनी केला होता त्या तक्रारी विरुद्ध गायत्री भंगाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे ही ‘मंडळी मला जात प्रमाणपत्रावरून नाहक त्रास देत आहेत. त्याविरुद्ध माझी तक्रार आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा‘, अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी त्यांची तक्रार दाखल करून घेत त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासने दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात जात वैध प्रमाणपत्र समितीकडून त्यांच्या जातीच्या दाखल्याची दिलेल्या पुराव्यानुसार तपासणी करण्याचे काम चालू होते. त्यानुसार त्यांनी पडताळणी करून त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. जात पडताळणी समितीकडून आपला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून आता गायत्री भंगाळे यांना नोटीस बजावण्यात येईल की, तुमचे जातीचे प्रमाणपत्र अवैध असून तुम्हाला तुमचे सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये? मात्र अद्याप अशी नोटीस भंगाळे यांना देण्यात आलेली नाही. गायत्री भंगाळे यांचे पती चेतन भंगाळे यांनी म्हटले आहे की, अद्याप मला कसलीही नोटीस याबाबत प्राप्त झालेली नाही. हे सर्व खरे असले तरी नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांना नोटीस प्राप्त झाल्यावर या आधारावर कोर्टात जाऊन दाद मागता येऊ शकते. त्यामुळे आज जात पडताळणी समितीकडून भंगाळे यांच्या जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले असले तरी मामला इथेच संपत आहे, असे होत नाही. त्या त्यांचे विरोधात कोर्टात जाऊन दाद मागू शकतात. दरम्यान भुसावळचे नगराध्यक्ष म्हणून त्या कामकाज पाहू शकतात. विरोधकांनी पहिला पढाव जिंकला आहे. तो असा की, जात वैध प्रमाणपत्र समितीकडे तक्रार करून ते अवैध ठरवण्यात त्यांना यश आले आहे. पण अजून हाय कोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट असे गायत्री भंगाळे यांना दाद मागण्याचा अधिकार आहे.

     

    50 नगरसेवकांच्या सदस्य संख्या असलेल्या भुसावळ नगरपालिकेत 27 सदस्य भाजपचे निवडून आल्याने तो पक्ष नंबर एकचा विरोधी पक्ष ठरला आहे. चार सदस्य शिवसेनेचे आणि एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस असे एकूण 33 सदस्य विरोधकात असून त्यांची एकजूट कायम आहे. जिल्ह्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून त्यात रजनी सावकारे यांचा पराभव झाला होता आणि गायत्री भंगाळे या विजयी झाल्या होत्या. गायत्री भंगाळे यांच्याकडे 12 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, चार काँग्रेस आणि एक अपक्ष असे 17 सदस्य संख्या आहे. 33 विरुद्ध 17 अशा सदस्य संख्येत भाजप युतीचे पारडे जड असल्याने त्यांच्याकडून प्रत्येक ठरावाला विरोध होतो, ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. अगदी सुरुवातीपासून नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांना कामकाज करणे विरोधकांनी अवघड केले होते. त्यातल्या त्यात माजी आमदार संतोष चौधरी स्वीकृत सदस्य झाल्यापासून विरोधक विशेषतः आक्रमक झाले आहेत. सुरुवातीला माजी आमदार संतोष चौधरी हे आक्रमक पवित्रा घेत चढाई करत होते. परंतु नंतर त्यांनी आपली पडती भूमिका घेऊन या आक्रमक पवित्र्यातून अंग काढून घेतले. अशा प्रकारे विरोधक सत्ताधारी यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असताना आता जात प्रमाणपत्र समितीकडून भंगाळे यांची जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने आता दुसरी लढाई सुरू झाली आहे. एकंदरीत या सर्व साठमारीत भुसावळ शहराच्या विकासाचे मात्र तीन तेरा होत आहेत. सध्या उन्हाचा तडाखा भुसावळकरांना चांगलाच बसत असून पिण्याचे पाणी 10 ते 12 दिवसानंतर येत आहे. तेही अशुद्ध पाणीपुरवठा होतो आहे. ही जटिल समस्या सोडविणे आवश्यक असताना राजकारणाचा डाव मात्र वेगळाच सुरू आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif