Sunday, May 29, 2022

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आईचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नाशिक सातपूर : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आईचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी. सातपूर येथील राधाकृष्णनगर मधील सरोदे संकुल मध्ये बुधवार दि. २० एप्रिल रोजी गॅस सिलेंडरचा भडका होऊन मोठा स्फोट झाला. या घटनेत आईचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

- Advertisement -

बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अर्चना ललेंद्र सिंह (रा. सरोदे संकुल रु. न ५ वय ४०)  या  स्वयंपाक करत असतांना गॅसनळी मधून गॅस लिकेज होऊन अचानकपणे आगीचा भडका झाला. त्यामुळे आगीत अर्चना या ७५ टक्के भाजल्या गेल्या.

त्यांना उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगी आस्था ललेंद्र सिंह (वय १६ ) ही देखील या आगीत २० टक्के भाजली गेली. तिला अशोकनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल केले आहे.

अर्चना यांचे पती ललेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु अर्चना या घाबरल्याने आगीतून बाहेर पडण्यास हिंमत दाखवत नव्हत्या. त्यामुळे होरपळून त्यांचा मृत्य झाला. यावेळी आग नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या