खूशखबर! गॅस सिलिंडर 135 रुपयांनी झाला स्वस्त !

0

नवी दिल्ली : देशभरातील इंधन दरांमध्ये सातत्याने होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. असे असताना ही दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारही प्रयत्नशिल आहे. दरम्यान, आज तेल विपणन कंपन्यांनी (OMC) 19 किलो वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडर दरांमध्ये 135 रुपयांची कपात केली आहे. ही दरकपात आजपासून लागू असेल. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो वजनाचा 2355.50 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता 2219.00 रुपयांना मळणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मायानगरी मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजीची किंमत Rs 2,307 वरून 2171.50 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत कमी करण्यात आली आहे. कोलकातामध्ये, ग्राहकाला 2,455 रुपया ऐवजी प्रति सिलेंडर 2,322 रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्येही ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांना 2,508 रुपयांऐवजी 19 किलो वजनाचा एलपीजी गॅस मिळविण्यासाठी 2373 रुपये खर्च करावे लागतील.
दरम्यान, 14 किलो वजनाच्या LPG सिलेंडरची किंमत राष्ट्रीय राजधानीत 1,003 आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट ₹200 सबसिडी मिळेल आणि त्यांच्यासाठी प्रभावी किंमत ₹803 प्रति 14.2-किलो सिलिंडर असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.