Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजर ; ६१ सिलेंडर जप्त
    गुन्हे वार्ता

    घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजर ; ६१ सिलेंडर जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजर ; ६१ सिलेंडर जप्त

    शनिपेठ पोलिसांची करवाई

    जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत ६१ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. ही कारवाई मंगळवारी, १७ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
    शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मोहन टॉकीज परिसरात छापा टाकत ३३ घरगुती व २८ व्यावसायिक गॅस सिलेंडर असा एकूण ६१ सिलेंडरचा साठा हस्तगत केला. याशिवाय गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारा वजन काटा, वाहन व अन्य साहित्य देखील जप्त करण्यात आले.

    याप्रकरणी राहुल नारायण सोनवणे (वय २९), राकेश नारायण सोनवणे (वय २५, दोघे रा. पिवळ्या भिंती, मोहन टॉकीज परिसर) आणि आदेश राजू पाटील (वय २३, रा. मोहन टॉकीज परिसर) या तिघांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    ही कारवाई पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील, गजानन वाघ, विकी इंगळे, योगेश साबळे, अमोल वंजारी, निलेश घुगे, नवजीत चौधरी आणि पराग दुसाने यांनी केली.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif